Gold Price Update 2026: सोनं १.७० लाखांच्या पार जाणार? जागतिक तणाव आणि ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सोन्याच्या दरात ‘ट्रेंड रिव्हर्सल’; पहा आजचे ताजे द

Gold Price Update 2026: नमस्कर मंडळी , सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, सोन्याने-Gold Price Update 2026 जोरदार पुनरागमन केले आहे. जागतिक स्तरावरील राजकीय अनिश्चितता आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे सोन्याचा भाव लवकरच १,७०,००० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत जाण्याची शक्यता मार्केट एक्सपर्ट्सनी वर्तवली आहे.

भाव वाढण्याची प्रमुख कारणे काय? Gold Price Update 2026

. ट्रम्प यांची व्यापार धोरणे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त १०% ते १५% टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

२. इराण-अमेरिका तणाव

मध्यपूर्वेतील इराणसोबतचा वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदार ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून सोन्याकडे वळत आहेत.

३. ट्रेंड रिव्हर्सल

गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर आता सोन्याने पुन्हा उभारी घेतली असून बाजार तज्ज्ञांच्या मते सोन्यासाठी आता ‘सुवर्णकाळ’ सुरू झाला आहे. Gold Price Update 2026

सोन्याचे भाव १.८० लाखावरून खाली का आले होते? (Real Reasons)

सोन्याच्या दरातील या २०-२५ हजार रुपयांच्या घसरणीमागे ३ प्रमुख तांत्रिक कारणे आहेत

१. नफा वसुली (Profit Booking): जेव्हा सोन्याने १.८० लाखाचा टप्पा गाठला, तेव्हा मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून आपला नफा वसूल केला. बाजारामध्ये अचानक सोन्याचा पुरवठा वाढल्याने किमती खाली आल्या आहेत.

२. जागतिक व्याजदरांचा परिणाम: अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाला की सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही काही काळ कमी होतात.

३. भू-राजकीय स्थितीतील बदल: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धांच्या परिस्थितीत थोडी स्थिरता आल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी इतर जोखमीच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

तज्ज्ञांचा अंदाज: सोनं पुन्हा २ लाखांच्या पार जाणार?

जरी सध्या सोन्याचे दर १.५६ लाखांच्या आसपास स्थिर असले, तरी जगभरातील अनेक बँकांनी (उदा. गोल्डमॅन सॅक्स) अंदाज वर्तवला आहे की २०२६ च्या अखेरपर्यंत सोनं २ लाख रुपयांचा टप्पा गाठू शकते. सध्याची ही घसरण केवळ तात्पुरती असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi