EPFO 3.0 New PF Rules 2026: नोकरदारांसाठी खुशखबर! आता PF काढणं होणार एकदम सोपं! EPFO 3.0 मोठा बदल घडवणार?

EPFO 3.0 New PF Rules 2026: नमस्कार मित्रांनो, देशातील लाखो नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लवकरच EPFO 3.0 हे नवीन व्हर्जन लाँच होणार असून, यामुळे पीएफ (PF) खाते वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी आठवडेभर वाट पाहावी लागणार नाही, तर बँकिंग व्यवहारांप्रमाणेच ही प्रक्रिया जलद आणि सुटसुटीत होणार आहे.

एटीएम (ATM) आणि युपीआय (UPI) द्वारे पैसे काढण्याची सुविधा

 EPFO 3.0 मधील सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता पीएफचे पैसे तुम्ही थेट ATM किंवा UPI द्वारे काढू शकणार आहात. यासाठी पात्र सभासदांना विशेष कार्ड दिले जाऊ शकते किंवा त्यांच्या बँक खात्याशी थेट कनेक्टिव्हिटी दिली जाईल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

फक्त ३ दिवसांत क्लेम सेटलमेंट (Faster Claims) EPFO 3.0 New PF Rules 2026

अधिक माहिती येथे पहा >>>>>

 सध्या पीएफ काढण्यासाठी २० ते २५ दिवस लागतात. मात्र, नवीन डिजिटल प्रणालीमुळे ९५% क्लेम हे ऑटोमॅटिक पद्धतीने सेटल होतील. जर तुमची केवायसी (KYC) पूर्ण असेल, तर अवघ्या ३ दिवसांत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मॅन्युअल पडताळणीची गरज कमी झाल्यामुळे ही प्रक्रिया वेगवान होणार आहे.

१३ ऐवजी फक्त ३ श्रेणींमध्ये पैसे काढता येणार

 पैसे काढण्याचे नियम सोपे करण्यासाठी ईपीएफओने EPFO 3.0 New PF Rules 2026 जुन्या १३ वेगवेगळ्या श्रेणींचे एकत्रीकरण करून फक्त ३ मुख्य श्रेणी केल्या आहेत

  • अत्यावश्यक गरजा: आजारपण, शिक्षण आणि लग्नासाठी (शिक्षण १० वेळा आणि लग्नासाठी ५ वेळा पैसे काढता येतील).

  • नोकरी सुटल्यास: बेरोजगार झाल्याच्या १ महिन्यानंतर ७५% आणि १२ महिन्यांनंतर उरलेली २५% रक्कम काढता येईल.

  • घर खरेदी किंवा निवृत्ती: घर बांधण्यासाठी किंवा ५५ व्या वर्षांनंतर पूर्ण रक्कम काढता येईल.

ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्स्फर (Auto Transfer)

 तुम्ही नोकरी बदलली की जुन्या कंपनीचा पीएफ नवीन कंपनीत ट्रान्स्फर करण्यासाठी आता अर्ज करण्याची गरज नाही.EPFO 3.0 New PF Rules 2026 अंतर्गत, तुमचा पीएफ बॅलन्स आपोआप (Automatically) नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्स्फर होईल. यासाठी मालकाची (Employer) मंजुरी घेण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे.

अधिक माहिती येथे पहा >>>>>

निवृत्तीसाठी २५% रक्कम सुरक्षित राहणार

नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील किमान २५% रक्कम निवृत्तीसाठी राखून ठेवावी लागेल. तुम्ही कितीही वेळा पैसे काढले, तरी ही रक्कम सुरक्षित राहील, जेणेकरून निवृत्तीनंतर तुमच्याकडे ठोस पुंजी शिल्लक असेल.

EPFO 3.0 मुळे पीएफ खाते हे आता केवळ निवृत्तीनंतर मिळणारे पैसे न राहता, तुमच्या गरजेनुसार वापरता येणारे एक ‘व्हर्च्युअल बँक खाते’ बनणार आहे. पारदर्शकता आणि वेग ही या नवीन प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi