Agricultural Unseasonal Rain Relief News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे पिके जमीनदोस्त झाले होते. ज्यानंतर कोलमडलेल्या शेतकऱ्याने राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. तर विरोधकांनी देखील शेतकऱ्यांची बाजू लावून धरत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी केली होती.
Agricultural Unseasonal Rain Relief News | 128 कोटींची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे. तर २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती येथे पहा >>>>
तर जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळीचा लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांना फटका बसला आहे. यावेळी पाच लोकांचा मृत्यु झाला तर ९ लोक जखमी झाले आणि ३६ जनावरे दगावली आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, कधीपासून वाटप
तसेच एप्रिलमध्ये देखील अवकाळीने राज्यातील शेतकऱ्यांना फटका दिला असून तब्बल १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे.Agricultural Unseasonal Rain Relief News दरम्यान आता जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते.जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.Agricultural Unseasonal Rain Relief News
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता