Aadhaar Card New Rules: आधार कार्ड अपडेट चे नियम बदलले ; आता घरी बसून करा ही कामे | आधार सेवांसाठी नवे शुल्क लागू

Aadhaar Card New Rules : नमस्कार मित्रांनो, UIDAI ने  ०१ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेट साठी अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नागरिकांना नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखे महत्त्वाचे तपशील घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बदलता येणार आहेत. त्याचबरोबर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे Aadhaar Card New Rules बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. यासंबंधी सविस्तर माहिती खाली जाणून घेऊया.

आत्ता नव्या बदलांमुळं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जाण्याची गरज राहणार नाही. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यासारख्या डिटेल्स आधार केंद्रावर न जाता ऑनलाईन अपडेट करता येऊ सकतात. ही प्रोसेस आता पॅन कार्ड किंवा पासपोर्ट सारख्या लिंक केलेल्या सरकारी रेकॉर्डच्या डेटासंबंधित डेटा वेरिफाय करेल. डॉक्यूमेंट अपलोड करणे किंवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Maharashtra Professor Bharti 2025: महाराष्ट्रात प्राध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता ; लवकरच होणार मोठी प्राध्यापक भरती

आधार सेवांसाठी नवं शुल्क लागू करण्यात आलं आहे. डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क द्यावं लागेल. बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी १२५ रुपये शुल्क द्यावं लागेल. ऑनलाईन अपडेट १४ जून २०२६ पर्यंत मोफत असतील. त्यानंतर शुल्क लागू केलं जाईल. ५-७  आणि १५ -१८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट सुरु राहतील. Aadhaar Card New Rules

आधार पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर १ जानेवारी २०२६ पासून पॅन कार्ड रद्द समजलं जाईल. नव्या पॅनकार्ड साठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Hindustan Copper Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

लहान मुले आणि सामान्य नागरिकांसाठी काय विशेष? Aadhaar Card New Rules

मुलांसाठीही UADAAI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ५ ते ७ वर्ष आणि १५ ते १७ वर्ष वयोगटासाठी बायोमेट्रिक Aadhaar Card New Rules अपडेट करणे पूर्णपणे विनामूल्य असेल. म्हणजेच मुलांच्या पालकांना यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे सुनिश्चित करेल की मुले मोठी झाल्यावर त्यांचा बायोमेट्रिक डेटा योग्यरित्या अद्यतनित केला जाऊ शकतो.

आधार कार्ड हे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा वैध पुरावा नाही, तर तो केवळ ओळखीचा पुरावा आहे, असे UIDAI ने स्पष्ट केले आहे. एकूणच, UIDAI चे हे नवीन पाऊल ‘डिजिटल इंडिया’ मिशनला आणखी बळकट करेल. नवीन नियमांमुळे केवळ आधार अद्यतनाची प्रक्रिया सोपी होणार नाही तर सुरक्षित आणि पारदर्शकही होईल.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana: महायुतीच्या गेमचेंजर योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट? लाडक्या बहिणीसाठी सरकारचे तब्बल "इतके रुपये" खर्च

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi