PM Kisan 21th Installment date and time: नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेली पीएम किसान योजना या योजनेच्या २१व्या हफ्त्याकडे-PM Kisan 21th Installment date and time देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या २१व्या हप्त्याचे २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होतील? आणि योजनेत नेमकं काय बदल झाला आहे? यासंबंधी संपूर्ण माहिती आता आपण घेऊया.
केंद्र सरकारच्या या योजनेत अंतर्गत आतापर्यंत २० हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा केले आहेत. मागील २० वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट रोजी थेट ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. आता २१ व्या हफ्त्याची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे.
२१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? PM Kisan 21th Installment date and time
सोशल मीडिया आणि काही माध्यमांच्या वृत्तानुसार या योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीमध्ये जमा होईल अशी चर्चा सुरू आहे परंतु अजूनही सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने आशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्राधान्य दिले आहे. आणि त्यांना २१ वा हप्ता आगाऊ वितरित केला आहे.
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मिळणार लाभ | PM Kisan 21th Installment date and time
केंद्र सरकारने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थी टाळण्यासाठी अत्यंत कडक असा नियम केला आहे. शेतकऱ्यांना आपल्या खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायला सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून एक केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वगळण्यात आले आहे.
ई-केवायसी (e-KYC) करण्याची सोपी प्रक्रिया ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय सोपे असून, शेतकरी घरबसल्या आपल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरद्वारे हे काम करू शकतात
1. सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. तिथे “Farmers Corner” या विभागात “e-KYC” हा पर्याय निवडा.
3. त्यानंतर आपला आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा.
4. आधारशी संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP टाका आणि सत्यापन पूर्ण करा.
असे केल्यावर तुमची माहिती अद्ययावत होईल आणि 21 व्या हप्त्याच्या रकमेतील कोणताही तांत्रिक अडथळा दूर होईल.