Maharashtra Talathi Bharti 2025 Update: महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये १७०० जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती; महसूल सेवकांसाठी राखीव संधी; प्रक्रिया सुरू

Maharashtra Talathi Bharti 2025 Update: नमस्कार मित्रांनो, बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तलाठी भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. १७०० रिक्त पदांसाठी लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे.

राज्यात लवकरच १७०० तलाठ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. या भरतीमुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दिलासा मिळणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. Maharashtra Talathi Bharti 2025 Update

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी मेगाभरती; ITI उमेदवार करा अर्ज

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठ्यांची १७०० पदे भरली जाणार असून, त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंतच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सदर माहिती महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेली आहे.

दरम्यान, २०२३ सालच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळीही पेसा क्षेत्रातील पदांची भरतीच्या उमेदवारांवरून राज्यातील १३ जिल्ह्यांत समस्या निर्माण झाली होती. मात्र, न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांसाठीचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांच्या पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Intelligence Bureau IB Bharti 2025: भारत सरकारच्या केंद्रीय गुप्तचर विभागात ३९४ रिक्त पदांची भरती; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

 👉👉  आत्ताच ही अधिकृत माहिती पहा 👈👈

महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा | Maharashtra Talathi Bharti 2025 Update

महसूल सेवकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने, त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभवानुसार अधिक गुण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi