MMRDA Recruitment 2026: मुंबईत मोठ्या पदावर नोकरीची संधी! MMRDA अंतर्गत ‘संचालक’ पदांची भरती; पगार २ लाखांच्या पार!

MMRDA Recruitment 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुंबईच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. जर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी आणि दांडगा अनुभव असेल, तर मुंबईच्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे ‘संचालक’ होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

विशेष म्हणजे, या पदासाठी मिळणारा पगार आणि मिळणाऱ्या सोयी-सुविधा हे कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीपेक्षा कमी नाहीत! पण अर्ज करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही या पदासाठी पात्र आहात का? अर्ज कुठे आणि कसा पाठवायचा? हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा!

MMRDA भरती २०२६: थोडक्यात माहिती

मुंबईतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे जाळे विणणाऱ्या MMRDA मध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या विभागांच्या संचालकांची पदे रिक्त आहेत. ही नियुक्ती थेट मुंबईत (BKC) असणार आहे. MMRDA Recruitment 2026

पदांचा तपशील आणि वेतन (Post & Salary)

या भरतीमध्ये दोन प्रमुख संचालकांची पदे भरली जाणार आहेत.

वेतन श्रेणी (Salary): निवड झालेल्या उमेदवारांना S-30 श्रेणीनुसार १,४४,२०० ते २,१८,२०० रुपये अधिक सरकारी भत्ते असा भरघोस पगार मिळणार आहे.

India Post Bharti 2026: भारतीय डाक विभागात अधिकारी होण्याची संधी! असिस्टंट मॅनेजर आणि पर्यवेक्षक पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

पात्रता: तुम्ही अर्ज करू शकता का? (Eligibility)

उमेदवारांकडे खालीलपैकी एक शैक्षणिक पदवी असणे अनिवार्य आहे:

  • संचालक (बांधकाम): सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी (Civil Engineering Degree).

  • संचालक (प्रणाली): इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिग्नलिंग आणि टेलिकॉम / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंगमधील पदवी.

अर्ज करण्याची पद्धत: सावधान! ही चूक टाळा…

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन (Offline) आहे. ऑनलाइन अर्जाच्या भ्रमात राहू नका, अन्यथा तुमची संधी हुकू शकते.

  1. अधिकृत वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करा.

  2. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज खालील पत्त्यावर पाठवा.

  3. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०३ मे २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) आहे.

NPCIL Bharti 2026: इंजिनिअर्ससाठी आनंदाची बातमी! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन (NPCIL) मध्ये मेगा भरती; कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखत!

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

उप महानगर आयुक्त, प्रशासन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), नवीन इमारत, ८ वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ मे २०२६ (वेळेची मर्यादा पाळा!).

का अर्ज करावा? MMRDA Recruitment 2026

MMRDA ही मुंबईतील सर्वात शक्तिशाली संस्थांपैकी एक आहे. येथे काम करणे म्हणजे मुंबईच्या भविष्यातील मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या प्रकल्पांचे नेतृत्व करणे होय. २ लाखांहून अधिक पगार आणि मुंबईतील उच्च पदस्थ नोकरी, ही संधी वारंवार मिळत नाही! MMRDA Recruitment 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi