e pik pahani kashi karavi 2025: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पहाणी pik pahani online प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उतारा वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज काढण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक असते. अन्यथा पिक कर्ज मिळण्यास अडचण येते. त्याच बरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर नोंद असावी लागते.
ई पिक पहाणी करणे म्हणजेच शेतातील पिकाची नोंद करणे होय. त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतातील झाडांची, पिकाची, विहीर, बोअरवेल, शेततळे, वहीत पड, कायम पड अशा ७/१२ संबधित विविध नोंदी शेतकरी मोबाईल अँप e peek pahani मधून करू शकतात.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरिपातील ई-पीक पाहणी अर्थात सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे अँप्सद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ईपीक पाहणी सोप्या पद्धतीने कशी करावी यासाठी खालील व्हिडिओ पहा.👇👇👇👇👇👇👇👇👇👇
ही पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख किती? e pik pahani kashi karavi 2025
शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे. या अँपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एका सहायकाची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहायक उर्वरित क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करणार आहेत.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे संपूर्ण राज्यात लागू केली आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलद्वारे अॅपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ईपीक पाहणी सोप्या पद्धतीने कशी करावी यासाठी खालील व्हिडिओ पहा.👇👇👇👇👇👇👇👇👇👇