Cylinder Booking Number: व्हाट्सअप वर ‘हाय’ पाठवा आणि गॅस सिलेंडर बुक करा; कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

Cylinder Booking Number: नमस्कार मंडळी,  सध्या आपण पाहतो की आपली बरीचशी कामे ही मोबाईल वरूनच होत आहेत. घरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते अगदी किराणामाल ऑनलाईन मागवण्यापर्यंत सर्व कामं आता ऑनलाईन होत आहेत. अशातच घरगुती वापरासाठी मिळणारा गॅस सिलेंडर सुद्धा आता ऑनलाईन व्हाट्सअप द्वारे बुकिंग करता येणार आहे. काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती? जाणून घेऊया.

देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरची बुकिंग आता अधिक सोपी केली आहे. या कंपन्यांना आता फक्त व्हाट्सअप वर ‘हाय’ मेसेज पाठवून गॅस सिलेंडर घर बसल्या बुक करता येणार आहे. तसेच तक्रार नोंदवणे आणि इतरही सेवा आता आपल्याला घरबसल्या घेता येणार आहेत.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे १०वी पास वर ३५४ जागांसाठी भरती

 व्हाट्सअप वर करा गॅस बुकिंग | Cylinder Booking Number

व्हाट्सअप वरून गॅस बुकिंग करण्यासाठी तुमच्या गॅस पुरवठादाराचा (इंडियन, एचपी गॅस, भारत गॅस) व्हाट्सअप नंबर तुमच्या फोनमध्ये सेव करणे आवश्यक आहे. त्यानंतर व्हाट्सअप वर ‘हाय’ किंवा ‘बुक’ असा मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला ऑटो रिप्लाय मध्ये पर्याय मिळतील त्यामधील ‘गॅस बुकिंग’ पर्याय निवडून तुमची ग्राहक आयडी किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून सिलेंडरची बुकिंग प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 गॅस बुकिंग साठी कंपन्यांचे व्हाट्सअप नंबर

१. HP गॅस: व्हॉट्सॲपद्वारे बुकिंगसाठी 9222201122 या नंबरवर ‘BOOK’ लिहून मेसेज पाठवावा.

२. भारत गॅस: व्हॉट्सॲपद्वारे बुकिंगसाठी 1800224344 या नंबरवर ‘BOOK’ लिहून मेसेज पाठवावा.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  ZP Kolhapur Shikshak Bharti 2025: कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांसाठी 'शिक्षक भरती' जाहीर ; अर्ज कुठे करायचा? आताच पहा

३.इंडेन गॅस: व्हॉट्सॲपद्वारे बुकिंगसाठी 7588888824 या नंबरवर ‘BOOK’ लिहून मेसेज पाठवावा.

 गॅस बुकिंग करण्यासोबतच व्हाट्सअप वर तक्रार आणि इतर सुविधा

घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याच्या सुविधेसह ग्राहकांना तक्रार नोंदवणे आणि इतरही सेवा घेता येणार आहेत. याशिवाय वेळोवेळी बदल होणाऱ्या सेवा आणि सुविधांचा लाभ ग्राहकांना मिळेल. एलपीजी सिलेंडरच्या कंपनीशी कनेक्ट होऊन सेवा कंपनीकडून वेळोवेळी आवश्यक माहितीचे मेसेज मिळतील.

गॅस कंपन्यांची एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग योजना उत्तम आहे. सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्याने या सुविधाचा उपयोग कनेक्शन धारकांना घेता येतो या सुविधेचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi