Ladki Bahin Yojana New Update: “या” एका चुकीमुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, काय आहे कारण समजून घ्या

Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आता आपल्या खात्याची ई-केवायसी(eKYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतरच या योजनेचा पुढील लाभ म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा १५ वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळे नियम सुद्धा बनवण्यात आले आहेत.

पुढील दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेने e-KYC करणं आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या लाखो जणांकडून या संकेतस्थळाचा वापर केला जात असल्याने लोक वाढला आहे. परिणामी e- KYC करताना अनेक अडचणी येत आहेत.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळणार? आदिती ताई तटकरे स्पष्टच बोलल्या

आधार कायद्यातील तरतुदींनुसार, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील लाभार्थ्यांची पडताळणी ई- केवायसीच्या (e-KYC) माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे, योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल.

नगर जिल्ह्यात एकाच कुटूंबातील दोन महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असल्याची खात जमा केल्यानंतर १४ हजार नावे कमी करण्यात आली आहेत. तरे दीड हजारांच्या जवळपास महिलांचे वय १८ वर्षापेक्षा कमी अथवा ६५ वर्षापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहेत. यामुळे ही नावे कमी करण्यात आली आहे. यामुळे सरकार पातळीवरून आलेल्या यादीतील १५ हजारांहून नावे कमी होणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्या सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana Online Apply : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या "या" लाडक्या बहिणींवर होणार कायदेशीर कारवाई; नवीन परिपत्रक जारी

Ladki Bahin Yojana New Update : १७८ लाभार्थ्यांचा योजनेला नकार

लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यातून १२ लाख ४१ हजार ८७६ महिलांनी अर्ज केले होते. यातील ११ लाख २६ हजार ६५२ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. यातील १ लाख २६ हजार महिलांचे अर्ज शासनाने पडताळणीसाठी पाठवले होते. तर १७८ महिलांनी स्व इच्छेने योजनेचा लाभ नाकारला आहे.

https://naukri24alert.com/

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा 

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi