Ladki Bahin Yojana: नमस्कार मंडळी, राज्यात सुद्धा चर्चेचा विषय असलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-Ladki Bahin Yojana” आता एका नवीन वादात सापडली आहे.महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी “लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारने “योजनेमुळे अर्थव्यवस्था कोलमंडली” असा आरोप फेटाळला असला, तरी तज्ज्ञांच्या मते या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असे सांगितले आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-Ladki Bahin Yojana” मुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमंडली असल्याचा दावा खोटा आहे.
लाडकी बहीण योजनेचा सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभाव निश्चितच आहे. शिक्षण, आरोग्य, आत्मसंयम व कौटुंबिक निर्णय यामध्ये सुधारणा झाली आहे.
परंतु आर्थिक दृष्ट्या, दीर्घकाळ टिकणारी बदल (उत्पन्न वाढ, व्यवसाय सुरू करणे इ.) अजून फारसा स्पष्ट दिसत नाही.
अंमलबजावणी आणि नियमन मध्ये बदल केल्यास आणी खर्चाच्या पारदर्शकतेचा अधिक विचार केल्यास हे योजनेचे फायदे वाढू शकतात, तर दोष कमी होतील.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-Ladki Bahin Yojana” चा सामाजिक उद्देश कौतुकास्पद असला तरी तिच्या अंमलबजावणीतील उणिवा आणि मोठा आर्थिक भार या दोन्ही बाबी तज्ज्ञांना चिंतेत टाकत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते, योग्य तपासणी, पारदर्शकता आणि वित्तीय शिस्त या उपाययोजना त्वरित राबवल्या नाहीत तर राज्याच्या अर्थसंतुलनावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
राज्य सरकारकडून त्याला उत्तर देण्यात आलं आहे त्याचा व्हिडिओ खाली दिला आहे.
