Ladki Bahin Yojana: नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत १५०० रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(DBT) द्वारे हस्तांतरित करण्यात येत आहेत. परंतु बऱ्याचशा महिलांना जून आणि जुलै म्हणजेच १२ आणि १३वा हप्ता आलेला नाही. अशातच लाडक्या बहिणींना ४५००/- रुपये मिळणार अशी माहिती समोर येत आहे. नेमकी काय आहे ही माहिती? जाणून घेऊया या लेखांमध्ये.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना १५०० रुपये दरमहा दिले जात आहेत परंतु हा ऑगस्ट महिना संपायला आला तरीसुद्धा या महिन्याचा लाभाचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. लाभाचे पैसे वितरण करण्यापूर्वी शासनाकडून एक शासन निर्णय जाहीर केला जातो तो सुद्धा अजून जाहीर केलेला नाही. याचे १ कारण असू शकते की अर्जाची पुन्हा पडताळणी.
पडताळणी दरम्यान २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणी अपात्र | Ladki Bahin Yojana
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचा गैरवापर करून बोगस अर्ज सादर केल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. या दरम्यान जवळपास २६लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे. त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे. या पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांनाच पुढील लाभ दिला जाणार आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे त्या महिला जर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निकषांमध्ये बसणार असतील तर त्या महिलांचे महिलांचा लाभ हा पूर्ववत करण्यात येईल. आणि मागील दोन महिन्यांचे न दिलेला लाभाचे पैसे येणाऱ्या हप्त्यामध्ये त्यांना देण्यात येतील. म्हणजेच मागील दोन महिन्यांचे ३००० रुपये आणि येणाऱ्या चौदाव्या हप्त्याचे १५०० रुपये असे मिळून एकूण ४५०० रुपये पात्र महिलांना दिले जातील.
सध्या तरी अशीच अपेक्षा आहे की, अपात्र यादीमधील बऱ्याचशा महिलांचे अर्ज पात्र व्हावे आणि त्यांचा लाभ हा पूर्ववत केला जावा. त्याचबरोबर बोगस अर्जाद्वारे ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी अर्ज केलेले आहेत त्यांचा लाभ हा कायमस्वरूपी बंद व्हावा. परंतु कोणत्याही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींवर अन्याय होता कामा नये. अशी सरकारला विनंती आहे.