Ladki Bahin Yojana Online Apply : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या “या” लाडक्या बहिणींवर होणार कायदेशीर कारवाई; नवीन परिपत्रक जारी

Ladki Bahin Yojana Online Apply: नमस्कार लाडक्या बहिणींनो,  राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे हेतूने राज्य सरकारने गेल्या वर्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली. या योजनेअंतर्गत लाखो महिलांनी लाभ घेतला. यामध्ये काही लाभार्थी बोगस निघाले तर काही पुरुषांनी देखील हातसफाई करून घेतल्याचे समोर आले आहे.

WhatsApp Join Box

आता यात आणखी भर म्हणजे सरकारी नोकरीत गले लठ्ठ पगार घेऊन सुद्धा काही महिलांनी या योजनेचे पैसे खाल्ल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा लाभ Ladki Bahin Yojana Online Apply अपात्र असूनही घेणाऱ्या ११८३ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  HSRP Number Plate Last Date: HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहन चालकांसाठी मोठी बातमी; आता 'या' तारखेच्या नंतर लागणार दंड

 👉👉नवीन परिपत्रक येथे पहा 👈👈

महिला आणि बाल विकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त डेटाच्या आधारे ही यादी तयार केली असून संबंधित जिल्हा परिषदांना कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. या योजनेनुसार सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असणारे पात्र नसतात. त्यामुळे आता अशा महिलांच्या अडचणी वाढणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |  Ladki Bahin Yojana Online Apply

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या २ कोटी २९ लाख महिलांना लाभ मिळत आहे. परंतु एकाच कुटुंबातील केवळ २ महिलांची पडताळणीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळणार? आदिती ताई तटकरे स्पष्टच बोलल्या

Ladki Bahini Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचे आली नवीन अपडेट, आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद

दरम्यान योजनेच्या आणि नियमानुसार“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” च्या लाभार्थी महिलांना १५०० रुपये प्रति महिना दिले जात आहेत. तर ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये दिले जातात.

दरम्यान, राज्यात बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट लाडकी बहीण योजनेत असल्याचे उघड झाले आहे. चक्क सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या योजनेत नोंदणी करत लाभ उठवल्या संदर्भात माहिती उघड झाली आहे. यानंतर राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनीही सरकारी कर्मचारी या योजनेत बोगस लाभार्थी म्हणून शिरकाव केल्याचे म्हटले आहे. Ladki Bahin Yojana Online Apply

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Hindustan Copper Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

या लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठीचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तुम्हालाही याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वरून परिपत्रक डाऊनलोड करू शकता.

 👉👉नवीन परिपत्रक येथे पहा 👈👈

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi