Ladki Sunbai Yojana: महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ला राज्यभर महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक मदत मिळाली आणि त्याचा मोठा राजकीय फायदा महायुतीला झाला. भाजपा-शिवसेना-एनसीपी महायुतीला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या पाठिंब्यामुळे मोठा विजय मिळाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडके सुनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आले आहे.
काय आहे लाडकी सून योजना? | Ladki Sunbai Yojana Marathi
राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना राबवल्या नंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून लाडकी सुनबाई योजना Ladki Sunbai Yojana घरोघरी पोहोचणार आहे. या योजनेअंतर्गत शिवसेना शाखेमध्ये किंवा जे काही शिवसेनेचे विभागीय कार्यालय असेल त्या ठिकाणावरून लाडक्या बहिणींना मदत केली जाणार आहे तसेच हेल्पलाइन नंबर सुद्धा दिला जाणार आहे.
Ladki Sunbai Yojana | योजना कशी राबवली जाणार?
-
शिवसेनेच्या प्रत्येक शाखा व विभागीय कार्यालयांतून मदत उपलब्ध होईल.
-
महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
-
जर कोणत्याही सुनबाईला सासरी त्रास होत असेल, तर त्या या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकतात.
-
तक्रार मिळाल्यावर त्वरित मदत पोहोचवली जाईल.
या हेल्पलाइन नंबर च्या माध्यमातून लाडक्या सुनेवर जर कोणी अन्याय किंवा अत्याचार करत असेल तर त्यांना शिवसेनेच्या या हेल्पलाइन नंबरची संपर्क करायचा आहे.. त्यानंतर त्यांना योग्य ती मदत दिली जाणार आहे. राजस्थानवर ही मोहीम राबवली जाणार असून त्यामुळे भविष्यामध्ये ज्या लाडक्या सून आहे त्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
याबद्दलच्या अधिक माहितीसाठी ही व्हिडिओ नक्की पहा.