Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळणार? आदिती ताई तटकरे स्पष्टच बोलल्या

Ladki Bahin Yojana New Update : नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेले आहे. मागील जून आणि जुलै २०२५ पासून तब्बल २६ लाख पात्र लाभार्थी महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. म्हणजेच या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. या महिलांना मिळणारा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे.

WhatsApp Join Box

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी Ladki Bahin Yojana New Update आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता पात्र महिलांचेदेखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का? असा प्रश्न लाडक्या बहि‍णींना पडलेला आहे. दरम्यान, कोणत्याही पात्र लाडक्या बहि‍णींवर कोणताही अन्याय होणार नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात १५१७ नवीन पदांसाठी होणार पोलीस भरती; आत्ताच लागा तयारीला

🔴👉 हे सुद्धा वाचा-  HSRP Number Plate Last Date: HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहन चालकांसाठी मोठी बातमी; आता ‘या’ तारखेच्या नंतर लागणार दंड

महायुतीच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षभरापासून कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याने दरमहा १५०० रुपये त्यांच्या खात्यातही जमा झाले,.

महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Mumbai Port Trust Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; लाखांवर मिळेल पगार !

२६ लाख अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळणार का? Ladki Bahin Yojana New Update

शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या अर्ज पडताळणी दरम्यान तब्बल २६ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. या महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी केली जाणार आहे. या पडताळणी दरम्यान या महिला पात्र आढळल्या तर मागील जून आणि जुलै महिन्याचा हप्ता या महिलांना देण्यात येईल, असे महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi