VVCMC Recruitment 2026: वसई-विरार शहर महानगरपालिकेत १५६ जागांसाठी मोठी भरती! १०वी पास ते पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

VVCMC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या (VVCMC) आस्थापनेवर विविध तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण १५६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी), लिपिक टंकलेखक, विजतंत्री, अग्निशमन विभाग आणि इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. १०वी पास, ITI, डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्रात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १७ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील | VVCMC Recruitment 2026

  • संस्थेचे नाव: वसई-विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar City Municipal Corporation – VVCMC).

  • एकूण रिक्त जागा: १५६ पदे.

  • पदांची नावे व पदसंख्या:

    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ५० पदे

    • लिपिक टंकलेखक: ५० पदे

    • विजतंत्री (Electrician): १० पदे

    • प्रमुख अग्निशमन विमोचक: १० पदे

    • कनिष्ठ अभियंता (विद्युत): ०७ पदे

    • आरेखक (Draftsman): ०४ पदे

    • सर्व्हेअर: ०४ पदे

    • उप-अग्निशमन केंद्र अधिकारी: ०४ पदे

    • उद्यान निरीक्षक: ०३ पदे

    • गाळणी निरीक्षक: ०३ पदे

    • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): ०२ पदे

    • सहाय्यक रसायनतंत्रज्ञ: ०२ पदे

    • अग्निशमन केंद्र अधिकारी: ०२ पदे

    • आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक: ०१ पद

    • सहाय्यक ग्रंथपाल: ०१ पद

    • सहाय्यक विधी अधिकारी: ०१ पद

    • सांख्यिक अधिकारी: ०१ पद

    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: ०१ पद

  • शैक्षणिक पात्रता:

    • कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी / स्थापत्य): संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०३ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी.

    • लिपिक टंकलेखक: १०वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. / इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य.

    • विजतंत्री व आरेखक: १०वी/१२वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.

    • प्रमुख अग्निशमन विमोचक: १०वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा ६ महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण.

    • इतर पदे (उद्यान निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, ग्रंथपाल, विधी अधिकारी, अग्निशमन अधिकारी इ.): पदानुसार संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी (B.Sc, B.Lib, Law, DMLT, Fire Engineering Diploma/Degree) व विहित अनुभव. (सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी).

📝 ही भारती सुद्धा पहा: BHEL Recruitment 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ४१५ जागांची मोठी भरती! डिप्लोमा व पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

  • वयोमर्यादा: ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी,

    • पद क्र. १ ते १५ साठी: १८ ते ३८ वर्षे.

    • अग्निशमन केंद्र अधिकारी: कमाल ४० वर्षांपर्यंत.

    • उप-अग्निशमन केंद्र अधिकारी: कमाल ३५ वर्षांपर्यंत.

    • प्रमुख अग्निशमन विमोचक: कमाल ३० वर्षांपर्यंत.

    • [मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ०५ वर्षे वयात सवलत लागू].

  • अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹१०००/- [राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग): ₹९००/-, माजी सैनिक: कोणतीही फी नाही].

  • अर्जाची पद्धत: ऑनलाईन (Online).

  • नोकरीचे ठिकाण: वसई-विरार (महाराष्ट्र).

महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा

वसई-विरार महानगरपालिकेमध्ये विविध विभागांत मोठ्या संख्येने जागा निघाल्याने स्थानिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी VVCMC Recruitment 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची तांत्रिक अडचण टाळण्यासाठी १७ डिसेंबर २०२६ पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज नक्की सादर करावा.

📝 ही भारती सुद्धा पहा: SIDBI Recruitment 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ६८ अधिकारी पदांची भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  • Q1. वसई-विरार महानगरपालिका भरती २०२६ अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत? उत्तर: या भरतीद्वारे कनिष्ठ अभियंता, लिपिक टंकलेखक, विजतंत्री आणि अग्निशमन दलातील विविध पदांच्या एकूण १५६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • Q2. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या भरतीत कोणती पदे उपलब्ध आहेत? उत्तर: १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक टंकलेखक (टायपिंग व MS-CIT सह), विजतंत्री (ITI सह), आरेखक (ITI सह) आणि प्रमुख अग्निशमन विमोचक (अग्निशामक प्रशिक्षण पूर्ण) ही पदे उपलब्ध आहेत.

  • Q3. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? उत्तर: ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत) आहे.

VVCMC Recruitment 2026 VVCMC Recruitment 2026 VVCMC Recruitment 2026