Ladki Bahin Yojana eKYC: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींसाठी आपली ई केवायसी करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. मागे ही मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होती. त्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली.
ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत.
Ladki Bahin Yojana eKYC: ‘लाडकी बहीण योजना’ e-KYC केली नसेल; तर १५०० रुपयांना मुकाल
महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र अशा देखील काही महिला आहेत, ज्या या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची नावं योजनेतून वगळण्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी Ladki Bahin Yojana eKYC सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.
या योजनेसाठी सुरुवातीला केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांची ई केवायसी बाकी असल्यानं सरकारने के वायसीला मुदतवाढ दिली होती. सरकारकडून ई केवायसीला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र समोर येत असल्येल्या माहितीनुसार यावेळी सरकार केवायसीची मुदत वाढून देण्याची शक्यता फारच कमी आहे.
दरम्यान, या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची Ladki Bahin Yojana eKYC अजूनही बाकी आहे, त्यामुळे ज्या महिलांची केवायसी वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांना सन्मान निधी वितरण बंद होऊ शकते, तसेच सरकारकडून देखील या योजनेची केवायसीची मुदत वाढून मिळण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
यासंबंधीच्या सर्व माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आता तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता