HSRP Number Plate Last Date: नमस्कार मंडळी, राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबर पाटी म्हणजेच HSRP नंबर प्लेट लावण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. २०२९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट लावण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेले होती. परंतु या तारखेपर्यंत बऱ्याचश्या वाहनांना HSRP Number Plate नंबर प्लेट लावण्यात आलेली नव्हती. किंवा काही कारणास्तव वाहनधारकांना ही नंबर प्लेट बुकिंग करण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी ही नंबर प्लेट लावण्यासाठी राज्य शासनाकडून तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे. काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी HSRP Number Plate हा शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बऱ्याचश्या वाहनधारकांनी आपल्या गाडीची ही नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग केले आहेत तर अनेक वाहनांना या नंबर प्लेट बसून सुद्धा झाल्या आहेत.
HSRP Number Plate कोणासाठी बंधनकारक?
राज्य शासनाकडून घेतलेल्या या निर्णयांमध्ये ज्या वाहनांची नोंदणी एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे, त्या सर्व वाहनांना आता लवकरात लवकर ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या वाहनधारकांना १० हजार रुपयांचा दंड बसणार आहे.
HSRP Number Plate Last Date नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ
वाहनांना HSRP Number Plate बसवण्यासाठी एकाच वेळी विविध विभागातून नोंदणी केली जात आहे. वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. HSRP Number Plate Last Date
त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही HSRP Number Plate Last Date, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.