ladki bahin yojana ekyc: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. डिसेंबर महिन्याची २७ तारीख आली तरीसुद्धा अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत. मग या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र येणार की जानेवारीमध्ये एकदम तीन महिन्यांचे पैसे येणार जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
ladki bahin yojana ekyc : लाडकी बहिण योजना ई केवायसी
तुम्हाला माहिती आहेच की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामध्येच आता ज्या महिलांना ही केवायसी करताना समस्या येत होत्या त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन आले आहे. आता तुम्ही घरबसल्या ही केवायसी ३१ डिसेंबर पूर्वी उरकून घ्या.
ladki bahin yojana | लाडक्या बहिणींची गरज संपली का?
जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची अंमलबजावणी होऊन २ महिन्याचे पैसे सुद्धा दिले होते. परंतु आत्ता नोव्हेंबर महिना उलटून गेला तरी सुद्धा या महिन्याचे पैसे आलेले नाहीत. मग प्रश्न पडतो की, लाडक्या बहिणींची गरज आता संपली का?
बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या मिळणाऱ्या पैशातून नियोजन केलेले असते, घरातील किराणा सामान, मुलांची फी, दवाखाना आणि औषधे यांसाठी लाडक्या बहिणींनी या पैशांचा वापर केला होता. परंतु आता दीड महिना उलटून गेला तरी सुद्धा पैसे मिळत नाहीत याची आता लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत.
ladki bahin yojana ekyc: ३००० रुपये येणार की ४५००
आज डिसेंबर महिन्याची २७ तारीख आली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत. मग आता २ महिन्यांचे पैसे एकत्र येणार की ३ महिन्यांचे. सरकारला विनंती आहे की निदान २ महिन्यांचे पैसे तरी लाडक्या बहिणींना जमा करावे. कारण आता बऱ्याच वेळा या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्याचे आणखीन पुढच्या महिन्यात असे सरकारकडून दिले जात आहेत यामध्ये सुद्धा आता विलंब झाला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ 1500; कारण काय? वाचा सविस्तर
बाकी या संबंधित तुमची मते काय आहेत हे आम्हाला नक्की सांगा.. यासाठी तुम्ही आमच्या YouTube Channel सुद्धा भेट देऊ शकता.