New rules from August 1: १ ऑगस्ट पासून महत्वाचे नियम बदलणार; UPI संबंधित ॲप्स ना बसणार पटका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मंडळी, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२५ म्हणजेच उद्यापासून New rules from August 1 अनेक नियम बदलणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. यात काय होणार मोठे बदल जाणून घेऊया.
ऑनलाइन डिजिटल किंवा UPI द्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वर वर वाढलेला लोड आणि अयशस्वी व्यवहार लक्षात घेता NPCI आणि UPI वापराशी संबंधित काही नियम बदलले आहेत. New rules from August 1

मोबाईल वरून बँक खात्यावरील बॅलन्स तपासण्यावर मर्यादा

सध्या आपण पाहतो की, मोबाईल वरून गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम यांसारख्या ॲप्स द्वारे बँक खात्यातील बॅलन्स तपासता येतो. आता यावर मर्यादा लागली असून दिवसातून फक्त ५० वेळा बँक खात्यावरील बॅलन्स तपासता येणार आहे..

pm kisan 20th installment date: योजनेचा २० वा हप्ता या दिवशी येणार..तारीख झाली फिक्स

ऑटो पे व्यवहाराची वेळ | New rules from August 1

ऑटोपेबाबतही एक महत्त्वाचा बदल होणार आहे. तुमचे EMI, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे UPI ऑटोपे व्यवहार आता फक्त नॉन-पीक अवर्समध्येच प्रोसेस केले जातील. या वेळा आहेत: सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतर. याचा अर्थ असा की जर तुमचं नेटफ्लिक्सचं बिल सकाळी ११ वाजता कापलं जात होते, तर आता ते लवकर किंवा नंतर कापले जाऊ शकतं. म्हणून, पेमेंट फेल होऊ नये म्हणून एक रिमाइंडर सेट करा.

Ration Card ekyc Maharashtra: आता मोफत रेशन बंद होणार | रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी सरकारने केली अनिवार्य

ट्रान्झॅक्शन फेल

तिसरा बदल ट्रान्झॅक्शन फेलबाबत आहे. जर तुमचे UPI पेमेंट अयशस्वी झालं, तर तुम्हाला त्याची स्थिती तपासण्यासाठी फक्त ३ संधी मिळतील. प्रत्येक प्रयत्नादरम्यान तुम्हाला ९० सेकंद थांबावं लागेल. सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. New rules from August 1

रिसिव्हरचं नाव दिसेल

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता तुम्हाला पैसे पाठवताना नेहमी रिसिव्हरचं नाव दिसेल. यामुळे चुकीचं पेमेंट टाळण्यास मदत होईल. हा फसवणुकीविरोधात एक अतिशय चांगला उपाय आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला पेमेंट करताना अधिक काळजी घेण्याची संधी मिळेल.

Ladki Bahin Yojana News: ‘या’ महिलांना आता लाडक्या बहिणीचे १५०० रूपये बंद, आदिती तटकरेंची मोठी माहिती?

UPI वर GST नाही

UPI वर कोणताही GST नाही. युजर्ससाठी २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचं पेमेंट देखील मोफत आहे. व्यापाऱ्यांना काही वेगळं शुल्क द्यावं लागू शकतं. परंतु, याचा तुमच्या नियमित ट्रान्सफरवर परिणाम होणार नाही.