Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट आली आहे. महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादात राहिली. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांनी टीका केली. यातच या योजनेबाबत नवनवीन माहिती मिळत येत आहे. माहितीच्या अधिकारातून काही धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे. या एका योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार येत असून, अन्य योजनांच्या निधीला कात्री लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांनी या कालावधीत आपले ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात | Ladki Bahin Yojana New Update
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून सुरूवात झाली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. जून २०२५ पर्यंत सरासरी २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. त्यासाठी ४३ हजार ४५ लाख कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली.
पडताळणीनंतर मे ते जून २०२५ दरम्यान लाभार्थ्यांना वगळण्यात येऊ लागले. अदिती तटकरे यांनी दिलेल्या महितीनुसार २६.३ लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले. तोपर्यंत १० महिने या महिलांना दर महिला दिड हजार रुपयांचा लाभ मिळत होता. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सरकारने ३ हजार ७८० कोटी ते ४ हजार ३३८ कोटी दरम्यानची रक्कम अपात्र अर्जदारांना वितरित केली असण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली व्हिडिओ नक्की पहा