Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र RERA येथे विविध रिक्त पदाची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! 40 हजारांपर्यंत पगार मिळेल

Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणअंतर्गत “उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

Maha RERA Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई
  • पदसंख्या –37 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

 

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उच्च वर्ग लघुलेखन
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.
  • इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • MS-CIT प्रमाणपत्र.
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक.
स्टायलिस्ट
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.
  • इंग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • MS-CIT प्रमाणपत्र.
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक
अधीक्षक
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.)
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधिक्षक किंवा सहायक अधिक्षक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
सहायक अधीक्षक
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहायक अधिक्षक किंवा वरिष्ठ लिपीक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव आवश्यक.
वरिष्ठ लिपिक
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.
  • न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील येथील ०३ ते ०५ वर्षाचा वरिष्ठ लिपीक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
अभिलेखापाल
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.
  • न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
तांत्रिक सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची विज्ञान (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी.
  • न्यायालय किंवा न्यायाधीकरणाचा ०१ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव.
कनिष्ठ लिपिक
  •  मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
  • मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS-CIT प्रमाणपत्र.
  •  न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाचा ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
लिपिक
  • मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
  • मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS-CIT प्रमाणपत्र.
  • न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील कनिष्ठ लिपीक पदाचा किमान ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
शिपाई
  • उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उर्तीण असने आवश्यक आहे.
  • न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Maha RERA Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा